
काश्मीर फाइल्स या चित्रपटातून काश्मिरी पंडितांचे पलायन हा विषय हाताळण्यात आलेला होता त्यानंतर आता ‘ दि केरला स्टोरी ‘ नावाचा एक चित्रपट येत असून विपुल शहा यांचा हा चित्रपट आहे. केरळ राज्यातील बेपत्ता झालेल्या 32 हजार महिलांची कथा या चित्रपटातून उलगडण्यात येणार असून माध्यमातील दाव्यानुसार हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झालेला असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
विपुल शहा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून सुदिप्तो सेन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. दहशतवादी संघटना महिलांची तस्करी करतात आणि अतिरेकी कारवाया करण्यासाठी त्यांचा वापर करून घेतात अशी सर्वसाधारण कहाणी या पिक्चरमध्ये पाहायला मिळत आहे मात्र ऑफिशियल ट्रेलर अजून आलेले नसल्याने या कथानकात इतरही अनेक पैलू पाहायला मिळतील अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
टीजरमध्ये एका मुलीला नर्स बनण्याचे स्वप्न असते मात्र तिचे घरातून अपहरण करण्यात येते आणि त्यानंतर तिचे धर्मांतर करून तिला आयसिस दहशतवादी म्हणून अफगाणिस्तानमध्ये जेरबंद करण्यात येते आणि त्यानंतर तिला दहशतवादी बनवण्यात येते. आपण एकटेच नाही तर आपल्यासोबत इतरही 32 हजार महिला यांना अशा पद्धतीने दहशतवादी बनवण्यात आलेले आहे असा देखील खुलासा ती या पिक्चरमध्ये करत आहे.
THE KERALA ISIS STORY COMING SOON! pic.twitter.com/2gcUFSGKcB
— Anshul Pandey (@Anshulspiritual) November 3, 2022