अजित पवार यांनी माफी मागावी : एकनाथ शिंदे

शेअर करा

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल त्यांना धर्मवीर म्हणण्याऐवजी स्वराज्यरक्षक म्हणा असे म्हटले होते त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला असून छत्रपती संभाजी महाराजांचा आणि त्यांनी केलेल्या बलिदानाचा अजित पवार यांच्या वक्तव्याने अपमान झालेला आहे त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे असे म्हटले आहे.

ठाणे येथील पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘ औरंगजेबाने संभाजी महाराजांनी धर्म सोडावा म्हणून त्यांचे हाल केले या हालअपेष्टांचे शब्दांमध्ये वर्णन केले जाऊ शकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी बलिदान केले म्हणून त्यांना धर्मवीर म्हटले जाते हा इतिहास तुम्ही कसा पुसू शकता ? ‘ असा देखील खडा सवाल त्यांनी अजित पवार यांना केलेला आहे.


शेअर करा