खळबळजनक.. अखेर ‘ त्या ‘ मराठी कलाकाराला बेड्या , काय आहे प्रकरण ?

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना कोल्हापूर येथील उघडकीस आली असून एका मॅट्रिमोनियल साईटवर ओळख झाल्यानंतर एका डॉक्टर युवतीशी लगट वाढवून तिचा विनयभंग करणाऱ्या टीव्ही मालिकेतील एका कलाकाराच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, जितेंद्र शेलाजी पोळ ( वय 32 राहणार कळंबा कोल्हापूर ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून तो सध्या एका धार्मिक मालिकेत काम करतो.

पीडित युवती ही पेशाने डॉक्टर असून एका मॅट्रिमोनियल साइटवर तिची आणि आरोपीची ओळख झाली होती त्यानंतर त्याने तिच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने पीडिता काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तसेच ये-जा करत असलेल्या मार्गावर तिचा पाठलाग करत मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे, असे म्हणून तिचा हात पकडला तसेच माझ्याशी लग्न कर असा देखील तो आग्रह करत होता त्यानंतर पीडितेने त्याला बाजूला सारून स्वतःची सुटका करून घेतली.

आपल्या सोबत झालेल्या या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणीने राजारामपुरी पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.


शेअर करा