
सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच विवाहाची जोरदार चर्चा सुरू असून पाकिस्तानमध्ये हा विवाह पार पडलेला आहे. एका 20 वर्षीय तरुणीने तिचे शिक्षक असलेल्या 52 वर्षीय व्यक्तीशी विवाह केलेला असून त्यांची ही अनोखी लव्ह स्टोरी सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. सदर तरुणीला शिक्षकांचा लुक आणि त्यांची पर्सनॅलिटी इतकी आवडली की ती त्यांच्या प्रेमात पडली असे तिने एका यूट्यूब चैनलशी बोलताना सांगितले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, जोया असे या तरुणीचे नाव असून ती 52 वर्षीय असलेले तिचे शिक्षक साजित आली यांच्या प्रेमात पडली. कॉलेजमध्ये शिकत असताना साजिद हे तिला शिकवायला होते. जोया हिने सुरुवातीला साजिद यांनी माझ्याकडे खूप दुर्लक्ष केले मात्र एके दिवशी मी त्यांना भेटून माझे प्रेम व्यक्त केले आणि मला तुमच्याशी लग्न करायचे आहे असे देखील सांगितले. आमच्या वयातील अडसर हा आता आमच्या प्रेमात आडवा येत नाही असे देखील जोया पुढे म्हणते.
जोया आणि साजिद त्यांच्या वयात तब्बल 32 वर्षांचे अंतर असून जोया हिने प्रपोज केल्यानंतर साजिद यांनी तिच्या संदर्भात गांभीर्याने विचार सुरू केला आणि आपल्या वयातील अंतर खूप जास्त असल्याने मला विचार करण्यासाठी एक आठवड्यांचा वेळ दे असे देखील ते म्हणाले आणि त्यानंतर एक आठवड्यात त्यांच्यातील प्रेम फुलू लागले.
साजिद म्हणाले की, मी हा निर्णय घेतल्यावर माझ्यावर माझे अनेक नातेवाईक नाराज झाले तसेच कित्येकांनी संताप देखील व्यक्त केला. माझ्या घरचे मला मी खूप सुंदर आहे ही मुलगी तुला साजेशी नाही असेदेखील त्यांनी सांगून पाहिले मात्र मला जोया खूप आवडू लागली होती तर दुसरीकडे तिच्या घरच्यांचा देखील तिला जोरदार विरोध होता मात्र तुम्ही प्रेम केले असेल तर लग्न करावेच लागेल अशी भूमिका तिने घेतली
जोया पुढे म्हणते की, साजिद हे परिसरातील सर्वोत्कृष्ट शिक्षक आहेत हाच त्यांचा गुण मला सर्वाधिक आवडला. त्यांची समजावून सांगण्याची पद्धत इतकी छान आहे की त्यांच्याकडे पाहतच राहावेसे वाटते. मी त्यांच्या प्रेमात असून त्यांना आवडणारा सर्व स्वयंपाक मी स्वतः बनवते आणि त्यांना आणून देते. त्यांच्या ऑफिसमध्ये मी चहादेखील बनवते असे देखील जोयाने सांगितलेले आहे. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रेम विवाहाची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे.