बॉयकॉटवरून अनुराग कश्यप म्हणाला की , ‘ तुम्ही आधी तरी कुठे .. ? ‘

शेअर करा

बॉलिवूडवर सध्या संक्रांत सुरू असून नवीन चित्रपट रिलीज होण्याआधीच करण्याच्या बॉयकॉट करण्याच्या धमक्या देण्यात येतात त्यामुळे अनेक चित्रपट चित्रपट गृहामध्ये पोहोचण्यापूर्वीच त्याबद्दल नकारात्मकता तयार होत आहे.अशा पार्श्वभूमीवर चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप यांनी वक्तव्य केले असून इंडिया टीव्ही ला दिलेल्या मुलाखतीत ‘ बॉयकॉट संस्कृती ही सोशल मीडियाची संस्कृती आहे ‘ असे म्हटले आहे.

अनुराग कश्यप हा वस्तुस्थितीवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी ओळखला जातो. सध्या सुरू असलेल्या बॉयकॉट संस्कृतीवर बोलताना अनुराग कश्यप म्हणाला की, ‘ हिंदी चित्रपटसृष्टीवर बहिष्कार टाकून हा उद्योग टिकणार नाही असे वाटते का ? मिठाई खाऊ नका असे डॉक्टर सांगतात मग मिठाई बंद झालेली आहे का ? . लोकांना मधुमेहाचा त्रास होत असेल तर मग मिठाई बनवणे बंद झाले आहे का ? कोणावर बहिष्कार टाकल्याने माझे आयुष्य संपणार नाही. माझ्याकडे खूप काम आहे. मी आयुष्यात कधीही बेरोजगार राहणार नाही, ‘ असेही तो पुढे म्हणाला.

अनुराग पुढे म्हणाला की, ‘ मी शिकवायचो तेव्हा इतके पैसे मिळवायचो जितके आज अनेक शिक्षकांना आताही मिळत नाहीत. मी कोणत्याही देशात जाऊन काहीही शिकवू शकतो. मी या देशात देखील अनेक गोष्टी शिकवू शकतो. कोणी बहिष्कार टाकून माझे आयुष्य संपणार नाही. माझे चित्रपट चालले नाही तर त्यांना आनंद मिळतो मात्र उद्या चित्रपट नेटफ्लिक्स वर येतील. दोबारा चित्रपटावर बहिष्कार टाकला होता मात्र तो नेटफ्लिक्सवर ट्रेंड झाला. माझ्या अनेक चित्रपटांवर याआधी बहिष्कार टाकण्यात आलेला आहे.

अनुराग कश्यप पुढे म्हणाला की, ‘ सोशल मीडियापासून प्रिंट मीडियापर्यंत बॉयकॉट ट्रेंड सुरू आहे. माध्यमांमध्ये नकारात्मक क्लीकबेट जास्त चालतात. ज्यांना चित्रपट पाहायचा आहे ते पाहतील ज्यांना नाही पाहायचा ते पाहणार नाही. मी सुरुवातीच्या काळात दहा वर्ष रस्त्यावर होतो तेव्हा तुम्ही कुठे होतात ? . माझ्या चित्रपटांवर बंदी घातली जायची तेव्हा कुठे होतात ? / माझे असे कोणते चित्रपट तुम्ही सिनेमागृहात पाहिले तुम्ही तर डाऊनलोड करूनच पाहिलेले आहेत . माझा तुमच्या आणि तुमचा माझ्या आयुष्यावर अधिकार नाही , ‘ असे देखील अनुराग कश्यप पुढे म्हणाला.


शेअर करा