मैत्रिणीच्या किचनमध्येच घेतला अखेरचा श्वास , महाराष्ट्रातील घटना

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना रत्नागिरी शहरात समोर आलेली असून प्रेयसीने नकार दिल्यानंतर तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा अंत केलेला आहे . रत्नागिरी शहरातील हे प्रकरण असून मयत व्यक्ती याने 21 ऑक्टोबर रोजी मैत्रिणीच्या फ्लॅटवर जाऊन गळफास घेतला. त्याच्या मैत्रिणीने त्यानंतर त्याला दुसऱ्या एका मैत्रिणीच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

उपलब्ध माहितीनुसार, साहिल असे मयत व्यक्तीचे नाव असून दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झालेला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याच्या बहिणीने यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्याच्या मैत्रिणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. साहिल याचे त्याच्या मैत्रिणी वर प्रेम होते म्हणून तो तिला लग्नासाठी विचारत होता मात्र ती त्याला सतत नकार देत होती त्यामुळे तो 21 तारखेला संतापात तिच्या रूमवर गेला आणि लग्नासाठी मागणी घातली त्याला तिने नकार दिला. तिने नकार दिल्यानंतर साहिल तिचा नकार पचवू शकला नाही आणि त्याने मैत्रिणीच्या किचनमध्ये जात गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटनेविषयी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


शेअर करा