सुषमाताई अंधारेंचा हल्लाबोल , वारकरी भाजप नेत्यांबद्दल गप्प का ?

शेअर करा

शिवसेना नेत्या सुषमाताई अंधारे यांनी कुर्डुवाडी येथे बोलताना भाजपवर जोरदार निशाणा साधला असून माझ्याबद्दल सीबीआय किंवा ईडी असा कुठलाही विषय नसल्याने तेरा वर्षांपूर्वीचे 14 सेकंदाचे व्हिडिओ व्हायरल करून वारकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. माऊली माऊली म्हणणारे वारकरी देखील माझ्याबद्दल इतके कसे काय बोलू शकले ? . त्यांना आतापर्यंत भाजपचे नेते का दिसले नाहीत. भाजपच्या नेत्यांनी अनेकदा महापुरुषाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेले आहेत मात्र त्यावेळी वारकरी गप्प का राहिले ? असा खडा सवाल केलेला आहे.

कुर्डुवाडी येथे गांधी चौकात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आयोजित सभेत त्या बोलत होत्या त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. वारकरीबद्दल बोलताना त्यांनी वारकऱ्यांची सध्या दिशाभूल केली जात असून भाजपच्या नेत्यांनी अनेकदा महापुरुषांबद्दल देखील आक्षेपार्ह वक्तव्य केलेली आहेत त्याबद्दल वारकरी गप्प का राहिले असा देखील प्रश्न विचारलेला आहे. महाप्रबोधन यात्रेला घाबरून माझ्यावर जाणीवपूर्वक आरोप केले जात आहेत तर उद्धव ठाकरे यांना कपट करून अपमानित करण्याचा करण्याचा हा डाव आहे मात्र त्यांना धडा शिकवण्याचा शिवतीर्थावर आपण केलेला आहे, ‘ असे देखील त्या म्हणाल्या.


शेअर करा