
ज्या महाराष्ट्राने कुणालाही उपाशी झोपू दिले नाही त्या महाराष्ट्रातील तरुणांना आता बेरोजगारीमुळे उपाशी झोपावे लागत आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच इतकी बेरोजगारी महाराष्ट्रात दिसत आहे. राज्यातील राज्यातील उद्योग परराज्यात जात आहेतच तर महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग देखील गुजरातमध्ये पळवण्यात येत आहेत इतके मोठे प्रकल्प जर महाराष्ट्राच्या घशातून ओढले जात असतील तर महाराष्ट्राची अस्मिता स्वाभिमान आणि प्रगतीवर हा फेकलेला दगड आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाबोल केला आहे.
ठाणे येथील एका पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, सुरुवातीला फॉक्सकॉन आणि आता एअरबस प्रकल्प देखील गुजरातला गेलेला आहे . आपण अनेक वर्ष ऐकत होतो हा प्रकल्प महाराष्ट्रातच येणार होता त्यासाठी जागेची देखील निश्चिती करण्यात आली होती मात्र महाराष्ट्रात हा प्रकल्प लँड होत असतानाच महाराष्ट्रातील कोणते हवामान खराब झाले की हा प्रकल्प अचानक गुजरातमध्ये लँड झाला हे कळायला मार्ग नाही.
महाराष्ट्रातील तरुणांना मिळणारी नोकरीची संधी दिवसेंदिवस हिरावून घेतलेली जात असून महाविकास आघाडीवर खापर फोडले जात असले तरी महाराष्ट्रातील जनता दुधखुळी नाही. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन आता चार महिने झाले हे चार महिने तुम्ही झोपा काढल्या का ? तुमची दिल्लीमध्ये चलती आहे त्यामुळे तुम्ही हाच काय पण रॉकेट लॉंचरचा प्रकल्प महाराष्ट्रात आणायला हवा होता असे देखील ते पुढे म्हणाले.