ज्या दिवशी विश्वासदर्शक ठराव जिंकला त्याच दिवशी धाडी , योगायोग की ..

शेअर करा

भाजप सत्तेत आल्यानंतर ईडी आणि सीबीआय यांचा गैरवापर होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ईडी आणि सीबीआयचा वापर करून जिथे भाजपची सत्ता नाही किंवा सत्ता आणण्यासाठी म्हणून विरोधी पक्ष नेत्यांना चौकशीच्या फेर्‍यात अडकवायचे किंवा फोडून भाजपमध्ये वळवायचे असे सत्र गेल्या काही वर्षात देशात सुरू झालेले आहे. बिहारमध्ये भाजपची सत्ता हातातून गेल्यानंतर भाजप बिथरलेला असून राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या काळात भरतीत घोटाळा झाला असा ठपका ठेवून गुरुग्राम येथील मॉलसह 25 ठिकाणी सीबीआयने धाडी टाकलेल्या आहेत.

बिहारचे सध्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या मालकीच्या कंपनीने हा मॉल उभा केलेला आहे असे सांगण्यात येत आहे तर तेजस्वी यादव यांनी या मॉलशी आपला कुठलाच संबंध नाही उलट या मॉलचे उदघाटन भाजप नेत्यानेच केले होते असे सांगितले आहे . बिहारमध्ये सत्ता हिसकावून घेतल्यानंतर भाजप वेगवेगळ्या पद्धतीने मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी संबंधित असलेले व्यावसायिक आणि कंपन्या यावर सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करत आहे असा आरोप राष्ट्रीय जनता दलाकडून करण्यात आलेला आहे.

बिहार येथे भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपला जोरदार झटका दिला आणि बुधवारी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला नंतर त्याच दिवशी या धाडींना सुरुवात करण्यात आली असाही एक योगायोग यावेळी पाहायला मिळाला आहे .


शेअर करा