भाजपने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले कधी ऐकलंय का ? , राहुल गांधी यांचा हल्लाबोल

गुजरातमध्ये आम आदमी पार्टीने भाजपशी चिंता वाढवली असून काँग्रेसने देखील आता मोठ्या प्रमाणात भाजपला शह देण्यासाठी आक्रमक धोरण अवलंबिले दिसत आहे. गुजरातमध्ये आपल्या पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला तीन लाख रुपयेपर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्यात येईल असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगत गुजरातमधील शेतकऱ्यांना काँग्रेस पक्षाला मत देण्याचे आवाहन केले आहे.

सोमवारी राहुल गांधी यांनी बोलताना सर्वच थरातील नागरिकांना एलपीजी सिलेंडर एक हजार रुपयेऐवजी फक्त पाचशे रुपये देण्यात येईल. शेतकऱ्यांना मोफत वीज आणि सर्वसामान्य ग्राहकांना 300 युनिटपर्यंत वीज मोफत देऊ, असे देखील त्यांनी सांगितले. अहमदाबाद येथे ते बोलत होते.

राहुल गांधी यांनी यावेळी भाजपवर जोरदार निशाणा साधताना,, ‘ भाजपने गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील उंच पुतळा उभारला मात्र पटेलांनी ज्या विचारसरणीसाठी स्वतःला वाहून घेतले होते त्याच लोकांच्या विरुद्ध भाजपने काम केलेले आहे मग पुतळा उभारण्यास काय अर्थ राहिला ‘, असेदेखील ते म्हणाले. भाजपचे सरकार मोठ्या उद्योगपतींचे कर्ज चुटकीसरशी माफ करेल पण एखाद्या शेतकऱ्यांचे कर्ज त्यांनी माफ केले असे तुम्ही कधी ऐकले तरी आहे का ? अशी देखील त्यांनी टीका केली .