
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना मुंबई येथे समोर आली असून बेरोजगारीमुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या एका मॉडेलने आत्महत्या केलेली आहे. आकांक्षा मोहन ( वय 30 ) असे या मॉडेलचे नाव असून शुक्रवारी वर्सोवा येथे ही घटना उघडकीला आलेली आहे.
आकांक्षा हिने सुसाईड नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे आपण सध्या खूश नसून आपल्याला शांतता हवी आहे असे म्हटले आहे. मुंबईतील उच्चभ्रू परिसरातील लोखंडवाला येथील यमुनानगर सोसायटीत ती राहत होती . सकाळी हॉटेल कर्मचारी तिच्यासाठी जेवण घेऊन पोहोचले त्यावेळी तिने दरवाजा उघडला नाही म्हणून हॉटेल कर्मचाऱ्यांच्या वतीने पोलिसांना पाचारण करण्यात आले त्यावेळी पोलिसांनी मास्टर की चा वापर करून दरवाजा उघडला त्यावेळी तिने गळफास घेतल्याचे समोर आले. गेल्या काही महिन्यांपासून तिला कुठल्याही स्वरूपाचे काम मिळत नव्हते म्हणून ती नैराश्यात गेली होती अशीही माहिती समोर आली आहे.