‘ असेच देशाला पुढे न्या ‘ , बलात्कारी राम रहिमचे भाजप नेत्यांना आशीर्वाद

शेअर करा

बलात्कार आणि हत्येचा आरोपी गुरमीत राम रहीम सध्या 40 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आलेला असून त्याच्या दर्शनासाठी भाजप नेत्यांची झुंबड उडाली आहे. उत्तर प्रदेशातील बागपत येथील आश्रमात सध्या तो थांबलेला असून त्याने ऑनलाइन सत्संगाचे आयोजन केले होते यावेळी भाजप नेत्या रेणू गुप्ता यांनी व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून त्याचे दर्शन घेतले.

भाजपच्या महापौर असलेल्या रेणू गुप्ता यांनी व्हिडीओ कॉलिंगवर त्यांना ‘ पिताजी आपका आशीर्वाद बना रहे ‘ अशा शब्दात या गुरमीत राम रहीमचा आशीर्वाद घेतला त्यानंतर गुरमीत बाबा याने ‘ तुम्हाला सर्वांना भरपूर आशीर्वाद तुम्ही सर्व जबाबदार लोक आहात असेच देशाला पुढे न्या ‘ असे देखील तो म्हणाला.

हरियाणातील निवडणुकीसाठी गुरमीत राम रहीम याला बाहेर काढण्यात आलेले असल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे तर भाजपकडून मात्र निवडणुकीशी याचा काही संबंध नाही असे सांगण्यात येत आहे. 2017 मध्ये एका बलात्कार प्रकरणात गुरमीत राम रहीम याला वीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे. त्याच्या कुटुंबीयांनी पॅरोलसाठी अर्ज केला होता तो मंजूर करण्यात आला आणि तो बाहेर आला. निवडणुकीच्या तोंडावरच गुरमीत राम रहीम बाहेर आल्याने त्याच्या अंधभक्तांची मते मिळावीत म्हणूनच त्याला बाहेर काढण्यात येते अशीही चर्चा आता सुरू झालेली आहे.


शेअर करा