रवि राणा हा सत्तेत येऊन दूधही चाटतो अन.., बच्चू कडू यांचे आव्हान

अमरावतीतील अचलपूर येथील सत्तासंघर्ष टोकाला पोहोचलेला असून अपक्ष आमदार बच्चू कडू आणि अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात वाद वाढत चाललेला आहे. बच्चू कडू हे गुवाहाटी येथे जाऊन आल्यानंतर रवी राणा यांनी त्यांनी खोके घेतले असल्याचा आरोप केलेला होता. बच्चू कडू यांनी कोट्यावधी रुपये लाटले असे देखील त्यांनी म्हटलेले होते अर्थात बच्चू कडू यांनी देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

रवी राणा यांच्या विरोधात बच्चू कडू यांनी राजापेठ पोलिसात तक्रार दिली असून, ‘ रवी राणा यांनी आपण खोकी घेतलेली आहेत हे सिद्ध करून दाखवावे. हे जर सिद्ध झाले तर त्यांच्या घरी जाऊन भांडी घासेल. एक तारखेपर्यंत आपल्यावरील आरोप सिद्ध करावेत अन्यथा आपण कठोर कायदेशीर पाऊल उचलणार आहोत ‘, असे देखील बच्चू कडू यांनी म्हटलेले आहे.

बच्चू कडू पुढे म्हणाले की, ‘ रवि राणा हा सत्तेत येऊन दूधही चाटतो आणि आमच्यावर आरोपही करतो. आरपारची लढाई करायची असेल तर मी त्याला तयार आहे. तो जिथे बोलावेल तिथे जायची आपली तयारी आहे ‘, असे देखील बच्चू कडू यांनी ठणकावले असून टीव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी रवी राणा यांना आव्हान दिले आहे.