‘ तुम्हाला नेमकी अडचण काय ? ‘ , मुंबई पोलिसांना न्यायालयाने खडसावले

पत्राचाळ प्रकरणात सध्या अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे न्यायालयात सुनावणीसाठी आले असताना पत्रकारांचा गराडा त्यांच्याभोवती पडला आणि त्यांनी देखील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ‘ राऊत प्रसारमाध्यमांसमोर सध्या राज्यातील राजकीय घडामोडी संदर्भात वक्तव्य करत आहेत हे चुकीचे आहे ‘, असे पोलिसांकडून न्यायालयासमोर सांगण्यात आले होते मात्र न्यायालयाने पोलिसांचीच कान उघाडणी करत राऊत राजकीय घडामोडी संदर्भात वक्तव्य करत असतील तर त्या सगळ्याची चिंता तुम्हाला का आहे ? तुमची नेमकी अडचण काय ? असा प्रश्न शुक्रवारी पोलिसांना विचारलेला आहे आणि या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास देखील नकार दिलेला आहे.

संजय राऊत यांनी नियमित जामिनासाठी न्यायालयात अर्ज केलेला असून प्रसार माध्यमांशी ते न्यायालयाच्या आवारात बोललेले होते यावर पोलिसांनी हरकत घेतली होती. शुक्रवारी पोलिसांनी विशेष न्यायालयाकडे यासंदर्भात तक्रार केली त्यावेळी न्यायालयाने पोलिसांना ‘ तुम्हाला नेमकी अडचण काय आहे ? ‘ . राऊत प्रसिद्धी माध्यमांशी बोलत असल्याने कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता मात्र या तपासात अडचण होत असेल तर त्याबद्दल ईडीने तक्रार करावी मात्र राजकीय मुद्द्यावर बोलले तर त्याला काही हरकत नसावी. सदर प्रकरण हे राजकीय सूडबुद्धीने दाखल करण्यात आलेले नाही असा दावा ईडीकडून केला जात आहे मग राजकीय मुद्द्यावर बोलत असल्याचा तुम्हाला त्रास काय होतो ? असा प्रश्न न्यायालयाने मुंबई पोलिसांना विचारलेला आहे.

संजय राऊत यांच्या सुरक्षेबद्दल देखील न्यायालयाने पोलिसांना कानपिचक्या दिलेला असून संजय राऊत यांना भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींकडून गोळीबार होणार आहे का ? त्यातील कोणी बंदूक घेऊन आले तर ती गोष्ट वेगळी आहे मात्र राऊत हे न्यायालयाच्या बाहेर त्यांच्या समर्थकांना भेटत असतील तर न्यायालय या संदर्भात काही करू शकत नाही ‘, असे सांगत हस्तक्षेप करण्यास देखील नकार दिलेला आहे.