जॅकलीनला माझ्याकडून फक्त प्रेमाची अपेक्षा होती मात्र.., काय म्हणतोय सुकेश ?

जॅकलीन फर्नांडिस ही सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली असून तिचा प्रियकर असलेला सुकेश चंद्रशेखर हा दोनशे कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी सध्या मंडोली येथील तुरुंगात आहे. सुकेशने खंडणीच्या पैशातून जॅकलीनला अनेक महागड्या वस्तू भेट दिल्या असा त्याच्यावर आरोप असून सुकेश याने मंडोलीच्या तुरुंगातून वकिलांसाठी एक चिठ्ठी लिहिलेली आहे त्यामध्ये जाकलिन निर्दोष आहे आणि तिला या प्रकरणात ओढणे दुर्दैवी आहे असेही म्हटले आहे.

काय म्हणाला सुकेश चंद्रशेखर ?

माझ्यावर आता फक्त आरोप करण्यात येत आहे मात्र हे आरोप कोर्टासमोर पुराव्यासह सिद्ध करावे लागणार आहेत. माझ्यावरील प्रकरणात जॅकलीनला आरोपी बनवणं हे चुकीचं आहे हे आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये होतो आणि त्याच नात्याने मी तिला आणि तिच्या कुटुंबीयांना भेटवस्तू दिलेल्या होत्या त्यात तिचा काय दोष ?

जॅकलीने हिने माझ्याकडून कधीच काही मागितले नाही मी तिच्यावर फक्त प्रेम करावं आणि तिच्यासोबत राहावं हीच काय ती तिची अपेक्षा होती मात्र मी माझ्या मेहनतीच्या कमाईतून तिला भेटवस्तू दिल्या होत्या हे मी कोर्टासमोर सिद्ध करेल. तिला आणि तिच्या कुटुंबीयांना या प्रकरणात बळजबरीने ओढले जात आहे. मला असा विश्वास आहे की मी जॅकलीन त्या सर्व गोष्टी परत देईल ज्या तिने गमावल्या आहेत सोबतच मी माझं निर्दोषत्व सिद्ध करेल मात्र माझ्याविरुद्ध सध्या जे काही चालू आहे हा केवळ राजकीय कट आहे ‘ असेही त्याने पुढे म्हटले आहे .