राज ठाकरे शंकरपाळे तर नवनीत राणा चकली , राणे यांची दोन मुले तर ..

शेअर करा

सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्हीच कसे बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत अशी सातत्याने जपमाळ ओढणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आनंदाचा शिधा या किटवर मात्र बाळासाहेब ठाकरे किंवा धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो लावणे महत्त्वाचे का वाटले नाही ? अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांनी केलेली आहे.

सुषमाताई अंधारे यांनी दिवाळीच्या फराळात राजकीय नेते शोधण्याचा प्रयत्न केलेला असून राजकीय नेत्यांना दिवाळीच्या फराळाची उपमा दिलेली आहे. त्यामध्ये शंकरपाळे पाहिल्यानंतर मला राज ठाकरे यांचे आठवण येते तसेच देवेंद्र फडणवीस हे गुलाबजामसारखे गोड आणि गुळगुळीत बोलतात तसेच धनंजय मुंडे हे बाहेरून कडक आणि आतून नरम असलेल्या अन् अनारश्याप्रमाणे आहेत असेही म्हटले आहे.

काय म्हणाल्या सुषमाताई अंधारे ?

देवेंद्र फडणवीस यांना पाहिल्यानंतर गुलाबजामची आठवण येते तसेच राज ठाकरे हे शंकरपाळ्यासारखे आहेत. शरद पवार मेथीच्या लाडू सारखे राजकारणात पौष्टिक आहेत तर उद्धव ठाकरे हे चौकोनी नानकटाईसारखे गोड आहेत. देवेंद्र फडणवीस हे गुलाबजामसारखे गोड आणि गुळगुळीत बोलतात मात्र गोड पदार्थ हे हानिकारक आहेत तर नवनीत राणा या गोल आणि काटेरी असणाऱ्या चकलीसारख्या आहेत.

राजकारणात नारायण राणे हे त्यातल्या दिशाहीन रॉकेट सारखे असून उद्धव ठाकरे हे बॉम्ब आहेत. फटाक्यामधील लड म्हणजे शिवसैनिक असून तुडतुड करणारे फटाके म्हणजे नारायण राणे यांची दोन मुले आहेत. शिवसेना सोडून गेलेले अनेक मंत्री आणि आमदार हे कावळा ब्रँड फटक्याप्रमाणे आहेत असे देखील त्या पुढे म्हणाल्या.


शेअर करा