दारूच्या दुकानातील ‘ ती ‘ बाटली पाहण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी

शेअर करा

देशात एक खळबळजनक घटना छत्तीसगड इथे समोर आले असून दारू पिण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती दुकानातून दारू घेऊन पिण्यासाठी घरी टेबलवर बसला याच दरम्यान त्याने दारूची बाटली पाहिली त्यावेळी बाटलीत चक्क मेलेला बेडूक असल्याचे त्याच्या लक्षात आले. संतप्त झालेल्या ग्राहकांने ही बाटली घेऊन दारूचे दुकान गाठले त्यावेळी त्याची ही बाटली पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती.

छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील ही घटना असून दिवाळी एन्जॉय करण्याच्या उद्देशाने या ग्राहकाने एका देशी दारूच्या दुकानातून तीन क्वार्टर बाटल्या खरेदी केलेल्या होत्या. बाटल्या घेऊन घरी गेल्यावर त्याने बाटली उघडण्यापूर्वी पाहिली त्यावेळी त्यामध्ये चक्क मेलेला बेडूक त्याला दिसून आला त्यानंतर त्याने ही बाटली घेऊन तसेच इतर काही नागरिकांना सोबत घेऊन दुकानाकडे धाव घेतली.

सदर दुकानापुढे नागरिकांचा मोठा जमाव जमलेला होता त्यावेळी दुकानदाराने या प्रकरणी बोलताना दारूचा बॉक्स जा गोदामातून येतो तो स्कॅन करून त्यातील बाटल्या ग्राहकांना दिल्या जातात मात्र बाटलीत बेडूक आढळल्याचा प्रकार आपण देखील पहिल्यांदाच पाहिलेला आहे असे देखील त्यांनी म्हटलेले आहे. समस्त तळीराम बांधवांनी याविषयी संताप व्यक्त केला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.


शेअर करा