‘ राम नाम सत्य है ‘ सुरु असतानाच तिरडीवरून उठून बसला तरुण , महाराष्ट्रातील घटना

मयत झालेल्या व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकतो का याचे उत्तर नाही असेच आहे मात्र महाराष्ट्रात एक वेगळाच प्रकार समोर आलेला असून एका घरात घरातल्या तरुणाचा मृत्यू झाला त्यानंतर नातेवाईक त्याच्या घरी दाखल झाले . त्याच्यावर अंत्यसंस्काराची देखील तयारी सुरू केली. त्याच्या घरासमोर तिरडी बांधण्यात आली आणि त्याचा देह तिरडीवर ठेवला त्यानंतर ‘ राम नाम सत्य है ‘ म्हणत त्याला घेऊन जात असतानाच अचानकपणे तिरडीत हालचाल जाणवू लागली आणि हा तरुण उठून बसला.

उपलब्ध माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या विवरा या गावात ही घटना घडलेली असून मंदिरात तिरडी विसाव्यासाठी थांबवण्यात आली होती त्यावेळी तिरडीवरून अचानकपणे हा तरुण उठून बसला. अत्यंत शोकाकूल वातावरणात पूर्ण कुटुंबीय असताना त्यांना हा आनंदाचा धक्का बसला तर अंत्ययात्रेत सामील झालेले लोक देखील गोंधळून गेले. प्रशांत मेश्रे असे या तरुणाचे नाव असून शोकाकुल वातावरणानंतर पूर्ण घरात अचानक आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

प्रशांत हा होमगार्डमध्ये कामाला होता मात्र काही दिवसांपासून तो आजारी असल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अनेक दिवस उपचार घेतल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि अखेर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घरच्यांनी त्याच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली आणि त्याला घरी घेऊन आले.

विधिवत पद्धतीने आंघोळ घातल्यानंतर तिरडीवर त्याला ठेवण्यात आले आणि अंत्यसंस्कारासाठी जात असताना विसावा म्हणून तिरडी एका मंदिराच्या समोर ठेवली त्या वेळी चक्क प्रशांत उठून बसला. अचानक पणे हा प्रकार घडल्याने त्याच्या अंगात देवी संचारली याची देखील चर्चा परिसरात सुरू झाली आणि नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले होते आणि त्यानंतर जमावावर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले .अकोला जिल्ह्यात या प्रकरणाची सध्या जोरदार प्रतिक्रिया सुरू असून हा दैवी चमत्कारच आहे अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.