अखेर ‘ ते ‘ बाळ सापडलं , आईने पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला होता

दिवाळीच्या दिवशी पूर्ण महाराष्ट्र आनंदाच्या भरात असताना मुंबई पोलीस ठाण्यात एका आईने आपले मूल मला परत मिळावे म्हणून ठिय्या मांडला होता . पोलिसांनी तात्काळ महिलेची तक्रार नोंदवून घेत पथकाला तपासाचे आदेश दिले आणि अवघ्या चोवीस तासांच्या आत या बाळाची सुटका करण्यात आली. बाळ ताब्यात आल्यानंतर या आईला आनंदाश्रू अनावर झाले होते.

उपलब्ध माहितीनुसार, जेवियर कॉलेज समोर येथील सार्वजनिक शौचालयासमोर एक कुटुंब राहत होते. 26 ऑक्टोबर रोजी त्यांची अडीच महिन्याची मुलगी बेपत्ता झालेली होती त्यानंतर कुटुंबियांनी आझादनगर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार नोंदवली . पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तब्बल आठ पथके यासाठी बनवण्यात आली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून स्थानिक रेल्वे आणि खबरी यांच्या माध्यमातून डोंगरी पथकाने या मुलीला शोधून आणले.

पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली असून, ‘ दिवाळीच्या मुहूर्तावर सण बाजूला ठेवून या आईसाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या पोलिसांनी ही कामगिरी केली. रेल्वे पोलिसांनी यासाठी महत्त्वाचे परिश्रम घेतले . मोहम्मद हनीफ असे आरोपीचे नाव असून तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे का ? याची याचादेखील तपास पोलिसांनी सुरू केलेला आहे. सदर मुलीची आरोपीने विक्री करण्याच्या उद्देशाने अपहरण केले होते का याचा देखील पोलीस सध्या शोध घेत आहेत .