मोदींना हवं तेव्हा घंटा वाजवतात अन हवं तेव्हा., भाजपच्या महिला मंत्री म्हणतात की ..

पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल अनेक भाजपचे नेते कौतुकास्पद शब्द उच्चारतात ईथपर्यंत ठीक आहे मात्र त्याही पुढे जात पंतप्रधान मोदी यांची आरती तसेच त्यांना दैवी अवतार घोषित करणे हेदेखील प्रकार भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आलेले आहे. योगी आदित्यनाथ सरकारमधील शिक्षण मंत्री असलेल्या गुलाब देवी यांनी एक वेगळेच विधान केले असून त्यांच्या या विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

गुलाब देवी म्हणाल्या की, ‘ नरेंद्र मोदी केवळ काही लोकांमुळे पंतप्रधान पदावरून पायउतार होणार नाहीत. त्यांना जेव्हा जसजसं वाटत तसे ते वागतात. त्यांना हवा असेल तर ते घंटा वाजवतात त्यांना हव असेल तर ते मजेरा वाजवतात. मोदी काहीही करू शकतात ते देवाचा अवतार आहेत. संपूर्ण भारत त्यांचे ऐकतो यापेक्षा त्यांची मोठी कोणती ओळख असू शकते ? ‘ असे देखील त्या पुढे म्हणाल्या.

चंदौसी विधानसभा मतदारसंघातील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या आल्या होत्या त्यावेळी देशात काही व्यक्ती अल्पसंख्यांक पंतप्रधान व्हावा म्हणून प्रयत्न करत आहेत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्या म्हणाल्या की , ‘ जिथे लोकशाही आहे तिथे कोणीही भाषणबाजी करू शकतो. त्याला कोणतेही बंधन नाही. त्याला आपण फारसे महत्त्व देत नाही. पंतप्रधान मोदी हे दैवी अवतार आहेत ‘