तिरडीवरून उठून बसला प्रकरणात ‘ वेगळाच ‘ अँगल आला समोर

महाराष्ट्रात दिवाळीच्या सुमारास अकोला तालुक्यात तिरडीवर मृतदेह उठल्याचे प्रकरण समोर आले होते. सदर प्रकरणात अंधश्रद्धेचा अँगल आढळून आलेला असून परिसरातील एका मांत्रिकाच्या विरोधात पोलिसांनी कारवाईचा फास आवळलेला आहे. मी त्या युवकाला जिवंत करतो असा दावा त्याने केला होता त्यानंतर तिरडीवर मृतदेह उठून बसला होता . पूर्ण जिल्ह्यात त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

उपलब्ध माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील विवरा येथील हे प्रकरण असून एका 25 वर्षीय युवकाला मयत घोषित करून त्याला अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात असताना तो अचानकपणे तिरडीवर उठून बसला. सदर प्रकरणी अठरा वर्षाचा तांत्रिक दीपक बोरले याच्या विरोधात 27 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर युवक हा गेल्या काही महिन्यांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यावेळी दीपक बोरले यांनी त्याच्या नातेवाईकांना विश्वासात घेतले आणि आपण त्याला जिवंत करू असे देखील सांगितले. 26 ऑक्टोबर रोजी या मांत्रिकाने युवकाला मयत घोषित केले आणि 26 ऑक्‍टोबर रोजी रात्री घरी आणले होते मांत्रिकाने त्यानंतर सर्व विधी करून त्याला जिवंत केल्याचा दावा केला त्यामुळे पोलिस देखील सक्रिय झाले आणि या मांत्रिकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.