विहिरीत कोणाचा मृतदेह म्हणून विवाहितेने धाव घेतली अन ..

नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे एक खळबळजनक घटना दिवाळीच्या दिवशी उघडकीला आलेली असून तळेगाव दिघे शिवारात एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आलेला आहे. सोमवारी 24 तारखेला दुपारी ही घटना उघडकीला आली असून मयत व्यक्तीचे नाव रवींद्र सिताराम दिघे असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार, तळेगाव ते जोर्वेकर वस्ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील एका विहिरीत एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती त्यांच्या पत्नीला मिळाली. त्यानंतर त्यांनी तिथे धाव घेतली तेव्हा हा मृतदेह त्यांच्या पतीचा असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी जागीच हंबरडा फोडला. स्थानिक नागरिकांनी संगमनेर तालुका पोलिसांना या प्रकरणी माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढला. संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून यामागचे कारण अद्याप पर्यंत समोर आलेले नाही.