धक्कादायक..चक्क माजी सैनिकाकडून महिलेचा विनयभंग

नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे एक खळबळजनक असे प्रकरण समोर आले असून आंबेवाडी येथील एका माजी सैनिकाने एका महिलेचा विनयभंग केल्याचे महिलेचे म्हणणे आहे. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली असून आपले आपल्या गळ्यातील मणी मंगळसूत्र देखील तिथे तुटून पडले असे देखील या महिलेने म्हटले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, एकनाथ कोणाजी राठोड असे आरोपीचे नाव असून ते मोहटा गडावर सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. आपल्याला राठोड हे वारंवार जीवे मारण्याची धमकी देत आहेत असे देखील महिलेने सांगत माझ्या पतीने भांडण सोडवले त्यावेळी त्याने माझा हात धरला आणि माझ्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असे महिलेचे म्हणणे आहे.

राठोड हे माजी सैनिक असून कायम दमदाटी करत राहतात तसेच माझ्याविरुद्ध काहीच केले तर जीवे मारून टाकेल अशी धमकी देखील देतात. सहा महिन्यापूर्वी आम्ही राठोड यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला होता त्याचा राग धरत ते आम्हाला त्रास देत आहेत असे महिलेने म्हटले आहे. सदर प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.