‘ पापा कि परी ‘ ने चक्क यूटर्न घेऊन ट्रक उडवला : पहा व्हिडीओ

शेअर करा

सोशल मीडियावर कधी काय होईल याचा काही नेम राहिलेला नाही अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आलेली असून एका मुलीच्या अनोख्या ड्रायव्हिंगची ही चर्चा आहे . सदर मुलगीही गाडी चालवत असताना तिच्याकडून ब्रेक लागला नाही आणि त्यानंतर ती एका ट्रकला जाऊन धडकली. सदर व्हिडिओ एका व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यानंतर तो जोरदार व्हायरल झाला .

उपलब्ध माहितीनुसार, सुनिल पवार नावाच्या एका यूजरने हा व्हिडिओ शेअर करत ‘ पापा की परी ‘ असे कॅप्शन दिलेले आहे. व्हिडिओमध्ये रस्त्याच्या मधोमध एक पिवळा ट्रक तिरका उभा असून यादरम्यान तिथून अनेक दुचाकी जात आहे. ट्रक रस्त्याच्या मधोमध असला तरी इतर वाहने व्यवस्थित जात आहेत तर ही मुलगी तिथे स्कुटी घेऊन जाते.

स्कुटी घेऊन सरळ जायचं तर मुलगी यू टर्न घेते आणि ट्रकच्या पुढच्या भागाला जाऊन धडकते. सरळ गाडी घेऊन जाण्याऐवजी यु टर्न घेऊन हा पराक्रम केल्याबद्दल तिच्या या कृत्यावर सोशल मीडिया जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. घटना घडताना ट्रकचालक देखील तिथेच असतो मात्र तो अचानकपणे बाजूला जातो म्हणून त्याचा जीव वाचतो अशा देखील प्रतिक्रिया या व्हिडिओबद्दल येत आहेत.


शेअर करा