‘ तुझ्या बायकोला मी प्रेग्नेंट केलंय ‘ , डीएनए चाचणीपर्यंत आले प्रकरण

देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आले असून उत्तर प्रदेशात एका व्यक्तीने दोन वर्षांपूर्वी एका तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केलेला होता मात्र प्रकरण पोलिसात गेल्यानंतर सदर प्रकरणातील आरोपी असलेला सुरज याने मुलीच्या आईला मी तिच्याशी लग्न करीन मात्र तिचे 18 वर्ष पूर्ण होऊ द्या असे सांगितले. मुलीचे 18 वर्ष पूर्ण होण्यास अवघे दोन महिने बाकी असल्याने पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली नाही मात्र आरोपीने दोन महिन्यानंतर लग्न करण्यास नकार दिला म्हणून तिचे दुसरीकडे लग्न लावण्यात आले.

पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार, दरम्यानच्या काळात आरोपीने आपल्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर त्याच्यासोबत ठेवलेल्या शारीरिक संबंधातून आपल्याला दिवस गेले आणि त्यानंतर घरच्यांनी आपले इतरत्र लग्न लावून दिले. आरोपी सुरज याने आपल्या पतीला भेटून तुझ्या पत्नीला मी गरोदर केलेले आहे असे देखील म्हणाला त्यामुळे पतीने त्याच दिवशी आपल्याला माहेरी पाठवून दिले आणि काही दिवसात आपण एका मुलीला जन्म दिलेला आहे.

पीडित तरुणी पुढे म्हणते की, 25 सप्टेंबर रोजी सुरज याने पुन्हा बलात्कार केला त्यानंतर शिवराजपुर पोलीस ठाण्यात आपण पोचलो असता आपला एफआयआर देखील पोलिसांनी लिहून घेतला नाही आणि अद्यापही सुरज याची पोलिसांनी चौकशी केली नाही. सुरज याची डीएनए चाचणी केल्यानंतर कारवाईची दिशा स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.