‘ तेरे बिन मर जावा ‘ रील्स बनवला अन तिच्या घरासमोर गेला मात्र..

शेअर करा

देशात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून एका तरुणीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या वीस वर्षीय तरुणाने तिच्या घराच्या समोर विष पिऊन आत्महत्या केली आहे. इंस्टाग्रामवर त्याने ‘ तेरे बिन मर जावा ‘ असे संगीत टाकून एक व्हिडिओ बनवला त्यामध्ये तिचा फोटो ठेवला आणि त्यानंतर तिच्या घरासमोर जाऊन विष घेतले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. प्रेयसीच्या कुटुंबीयांनी त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती असा आरोप मयत शुभमचे कुटुंबीय करत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील झाशी येथील बडागाव गेट बाहेर असलेल्या मास्टर कॉलनी येथे शुभम हा राहत होता. एका मेडिकलच्या दुकानात तो काम करत होता त्या वेळी सदर तरुणी ही त्याच्या मेडिकलवर आलेली असताना त्यांच्या ओळख झाली आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले मात्र घरच्यांचा विरोध असल्याने शुभम हा हतबल झालेला होता . बुधवारी त्याने इंस्टाग्रामवर स्वतःची रिल्स अपलोड केली आणि त्यानंतर तिच्या घरासमोर जाऊन विष पिऊन आत्महत्या केली.

शुभम याने विष घेतल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला होता. शुभम याच्या वडिलांनी तरुणींच्या कुटुंबीयांवर खळबळजनक असे आरोप केले असून त्यामध्ये या तरुणीच्या घरातील कुटुंबीय सातत्याने आपल्या मुलाला धमकावत होते म्हणून तो नैराश्यात गेलेला होता आणि त्यातूनच त्याने आत्महत्या केली असे म्हटले आहे.


शेअर करा