देशात पुन्हा एक हजार रुपयाची नोट ? सरकारचा अखेर खुलासा

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून त्यामध्ये 2016 साली पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदी करून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केलेल्या होत्या आणि एक जानेवारीपासून एक हजार रुपयाची नोट पुन्हा सुरू होणार आहे अशा आशयाचा हा व्हिडिओ आहे मात्र केंद्र सरकारने असा कुठलाही प्रकार होणार नसून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितलेले आहे.

केंद्र सरकारने 2018- 19 पासून दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केलेले आहे असे देखील संसदेत सांगितलेले आहे त्यानंतर पुन्हा केंद्र सरकार एक हजार रुपयाची नोट आणणार का ? याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार चालू आहे . त्यात हा व्हिडीओ सोशल मीडियावर आला आणि झपाट्याने व्हायरल झाला त्यामध्ये एक जानेवारी २०२३ पासून एक हजार रुपयांची नवीन नोट येणार आहे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत पुन्हा जमा कराव्या लागतील असा हा व्हिडिओ आहे. पीआयबी फॅक्ट चेक यांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचे सांगितले असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.