बायकी चाल अन अंगात बुरखा , हॉस्पिटलमध्ये आला पण ..

सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून सोलापूर येथील ही घटना आहे. बाळंतपणासाठी आणलेल्या पत्नीला वेदना सुरू झाल्यानंतर तिला सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते याच दरम्यान तिची तब्येत नाजूक असल्याची माहिती पतीला कळाली मात्र तेथील रूममध्ये पुरुषांना प्रवेश नसल्याकारणाने या व्यक्तीने चक्क बुरखा घालून पत्नीला भेटण्यासाठी रूममध्ये प्रवेश केला मात्र कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

उपलब्ध माहितीनुसार, शनिवारी रात्री ११:०० च्या सुमारास ही घटना उघडकीला आलेली असून मौला असे या व्यक्तीचे नाव आहे. डिलिव्हरी वार्डमध्ये जात असताना त्याने हातात पाण्याची बाटली घेऊन जात प्रवेश केला त्यावेळी सुरक्षा रक्षकाने त्याला हटकले तेव्हा त्याने पाण्याची बाटली दाखवली आणि आत गेला जवळपास पंधरा मिनिटे तो पत्नी जवळ बसून होता.

डॉक्टर तिथे आल्यानंतर त्यांनी पेशंटजवळ कोण आहे असे विचारले त्यावेळी त्याला बोलावे लागले आणि त्याचा आवाज हा महिलेचा नसल्याचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी त्याचा बुरखा काढला त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. बायकोला भेटण्यासाठी जात असताना चालण्याची पद्धत देखील त्याने महिलेसारखीच ठेवली त्यामुळे कुणाला शंका आली नाही. बायकोला भेटण्यासाठी त्याने जी पद्धत अवलंबली तिची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू असून बायकोवरील प्रेमापोटी त्याने हा प्रकार केला असल्याचे समजते.