पतीला घटस्फोट देत कुत्र्यासोबत उरकलं लग्न , महिला म्हणतेय की..

सोशल मीडियावर सध्या एका महिलेच्या विवाहाची जोरदार चर्चा सुरू असून या महिलेने चक्क पाळीव कुत्र्यासोबत विवाह केलेला आहे. कुत्रा आपल्या मालकाशी अत्यंत प्रामाणिकपणे वागतो याची जाणीव असल्याने या महिलेने पतीला घटस्फोट दिला आणि त्यानंतर कुत्र्यासोबत लग्न केले. लंडन येथील ही घटना असून अमंडा रोजर्स असे या महिलेचे नाव आहे.

महिलेचे वय 49 वर्ष असून 2014 साली त्यांनी त्यांच्या पत्नीपासून घटस्फोट घेतलेला होता. एका खाजगी चॅनलला मुलाखत दिल्यानंतर त्या पुन्हा चर्चेत आलेल्या आहेत. विशेष म्हणजे अमंडा यांनी हे लग्न लपून-छपून केलेले नसून तब्बल दोनशे लोकांनी त्यांच्या या लग्नाला उपस्थिती लावली होती. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे लग्न असल्याप्रमाणे या विवाहासाठी मोठ्या पद्धतीने डेकोरेशन देखील करण्यात आलेले होते. खुर्चीवर फक्त एक कुत्रा बसलेला होता तर त्याच्या बाजूला ही नवरी अमांडा बसलेली होती.

कुत्र्याचे नाव शेब्रा असे असून दोन महिन्याचा असल्यापासून आपण त्याचा सांभाळ केलेला आहे याच दरम्यान आपण त्याच्या प्रेमात पडलो आणि पतीसोबत आपले कधीच जमले नाही असे सांगत अखेर आपण पतीला घटस्फोट दिला आणि कुत्र्यासोबत लग्न केले असे म्हटले आहे. आपल्या पतीच्या खाण्यापिण्याची आपण व्यवस्थित काळजी घेतो असे देखील त्यांनी म्हटलेले असून त्याच्या डोळ्यात आपल्याला खरे प्रेम दिसते अन आपण त्याच्याशिवाय एक मिनिट सुद्धा राहू शकत नाही असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.