धनकवडीच्या ‘ त्या ‘ तरुणीने काढलं होत दुसरं एक तिकीट ?

निरा नदीच्या पात्रात आढळून आलेल्या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर हा प्रकार म्हणजे आत्महत्या आहे की घातपात हा प्रकार शोधणे पोलिसांसाठी जिकिरीचे ठरत आहे. धनकवडी येथील ही तरुणी असून 12 जानेवारी रोजी ती घरातून बाहेर आईला सांगून घरातून बाहेर पडली होती. कात्रज वरून तिने शिरवळ गाठले मात्र जाताना बसचे दोन तिकिटे काढलेली होती त्यामुळे या प्रकरणात तपास करणे पोलिसांसाठी जिकिरीचे होत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, नेहा शरद पिलाने ( वय वीस वर्ष राहणार वांगणी तालुका वेरळा सध्या राहणार धनकवडी ) असे तरुणीचे नाव असून शिरवळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे मात्र सदर तरुणी कुणासोबत तिकडे गेलेली होती याचाही पोलीस सध्या शोध घेत आहेत . खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी येथे नीरा नदीपात्रात पंधरा तारखेला तिचा मृतदेह आढळून आलेला होता.

कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच इतर संपर्क यंत्रणेतून तिची ओळख पटली. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक तरुणी बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांकडे होती त्याच्या आधारे तरुणीच्या घरच्यांना पोलिसांनी बोलावून घेतले त्यावेळी हा मृतदेह तिचा असल्याचे स्पष्ट झाले. तिने शिक्षण अर्धवट सोडलेले होते आणि घरच्यांनी तिचा विवाह ठरवलेला होता त्यानंतर ती घरातून बाहेर पडली आणि परत आली नाही यावरून घरच्या व्यक्तींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलीस तपासात आत्तापर्यंत ती कात्रज येथून शिरवळला दोन तिकिटे काढून गेलेली होती त्यामुळे ही दुसरे तिकीट तिने कोणासाठी काढले होते ? याचा पोलीस साध्या शोध घेत आहे.