दोनदा पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा अखेर गळफास

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यात उघडकीला आलेली असून लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणाने तब्बल दोन वेळा घरातून पळून नेले आणि पळवून नेल्यानंतर वारंवार अत्याचार केले. त्यानंतर समाजात आपली बदनामी झाली तसेच इतके सगळे होऊनही त्याने आपल्याला लग्नाला नकार दिला यामुळे मानसिक दबावात एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केलेली आहे. तीन ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला होता त्यानंतर 20 जानेवारी रोजी मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिलेली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही सतरा वर्षीय होती आणि इयत्ता अकरावीमध्ये शिकत होती. सहा मे 2020 रोजी मध्यरात्री ती घरातून गायब झाली त्यानंतर वडिलांनी तिला कोणीतरी फुस लावून पळून गेलेले आहे अशी तक्रार दाखल केलेली होती. पोलीस तपासात परिसरातील एका मुलाने तिला वर्धा येथे पळून नेले असल्याचे समोर आले त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले त्यावेळी मुलीने त्याने लग्नाचे आमिष दाखवून आपल्या सोबत शरीरसंबंध ठेवण्याची देखील कबुली दिली आणि या मुलाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला.

मुलाला अटक करण्यात आली त्यानंतर त्याने जेलमधून बाहेर आल्यावर तिला सतत त्रास देण्यास सुरू केले म्हणून वडिलांनी अखेर ऑगस्ट २०२२ रोजी तिला आपल्या एका नातेवाईकाकडे बाहेरगावी पाठवले मात्र तिथे देखील ५ ऑगस्ट २०२३ रोजी ती घरातून गायब झाल्याची खबर वडिलांना मिळाली. वडिलांनी तिचा ठिकठिकाणी शोध घेतला अन त्यानंतर अखेर ती आढळून आली म्हणून तिला घरी आणले अन काही दिवसात तिने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रियकराच्या दबावामुळेच तिने हा प्रकार केला असल्याचे वडिलांचे म्हणणे असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे .