पुण्यात खळबळ..आमचे काही वाकडे करू शकत नाही म्हणत दुकानात..

पुण्यात एक खळबळ जनक असा प्रकार समोर आलेला असून पिंपरी इथे दुकानात कामाला घेतले नाही म्हणून पाच ते सहा जणांनी दुकानात घुसून मालकाला शिवीगाळ केलेली आहे तसेच दहशत देखील निर्माण केली. 14 तारखेला रात्री सव्वा आठच्या सुमारास पिंपरी येथे हा प्रकार घडलेला असून तक्रारदार व्यक्ती यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, नारायण गोपीचंद चावला ( वय 47 राहणार काळेवाडी ) असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव असून शिवम यादव ( वय 20 राहणार पिंपरी ) याच्यासह त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल केलेला आहे . शिवम यादव याला कामाला घेतले नाही म्हणून तो आपल्या पाच ते सहा साथीदारांसोबत सिमेंटचा गट्टू आणि हातात कमरेचा बेल्ट घेऊन आपल्या दुकानात घुसले आणि पोलिसात तक्रार केली तर सोडणार नाही असे सांगून आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही असे म्हणत दहशत निर्माण केली. तक्रार व्यक्ती यांनी तात्काळ पोलिसात धाव घेऊन त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.