भावनेच्या आहारी जाऊन ‘ तसल्या ‘ प्रकाराला हो म्हणाली अन ..

शेअर करा

सध्या महाराष्ट्रात एक खळबळ जनक अशी घटना कल्याण जवळ कोळशेवाडी परिसरात उघडकीला आलेले असून अवघ्या सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला एका व्यक्तीने इंस्टाग्रामवर मैत्री करत प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्यानंतर आपल्या जीवाचे बरे वाईट करण्याची भीती दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरू केले. तब्बल एक वर्षांपासून त्याने या मुलीवर अत्याचार केलेले असून पीडित मुलगी गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार समोर आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अक्षय बाळू गायकवाड असे आरोपी तरुणाचे नाव असून तो ठाण्यात राहतो. त्याची आणि अल्पवयीन मुलीची इंस्टाग्रामवर मैत्री झालेली होती त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अक्षय हा तिला आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने दाखवू लागला आणि त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंधाची मागणी करू लागला. पीडित मुलीने त्याला नकार दिला त्यावेळी त्याने आपण जीवाचे बरे वाईट करून घेऊ अशी धमकी दिल्याने तिने भावनेच्या आहारी त्याच्या या कृत्याला संमती दिली आणि त्यानंतर तो तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करू लागला.

गेल्या एक वर्षांपासून तो तिच्यावर सतत अत्याचार करत होता त्यातून या मुलीला दिवस गेले आणि घटना उघडकीला आली त्यावेळी ती तब्बल सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले . कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अक्षय गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे


शेअर करा