ज्यांच्या लग्नाच्या पत्रिका वाटल्या ते प्रेमीयुगुल मयत , शोधला असा पर्याय की ?

शेअर करा

गुजरातमध्ये एका प्रेमीयुगुलाची सध्या जोरदार चर्चा सुरू झालेली असून विशेष म्हणजे या प्रेमीयुगुलाचा मृत्यू झालेला आहे . गुजरातमधील तापी येथील न्यू नेवाळा परिसरात एका प्रेमीयुगुलाच्या चक्क मृत्यूनंतर त्यांचे लग्न लावण्याचा प्रकार समोर आलेला आहे. प्रियकर प्रेयसीच्या कुटुंबांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतलेला असून त्यांनी चक्क प्रियकर आणि प्रेयसी यांचा पुतळा तयार केला आणि आदिवासी परंपरेने एकमेकांसोबत त्यांचे लग्न लावले. जिवंत असताना त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून पुतळा बनून ही इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

तापी नदी जवळील न्यू नेवाळा गावात ही घटना उघडकीस आली असून परिसरातील गणेश पाडवी नावाच्या युवकाचे जुने नेवाळा गावात असलेल्या रंजना पाडवी नावाच्या एका तरुणीवर मनापासून प्रेम होते मात्र दोन्ही कुटुंबातून घराला लग्नाला विरोध सुरू झाल्यानंतर ते हतबल झालेले होते. 14 ऑगस्ट 2022 रोजी त्यांनी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्यानंतर दोन्ही कुटुंबांना पश्चाताप झाला आणि त्यांनी जिवंतपणे जर आपली चूक झाली तर तिचे परिमार्जन म्हणून त्यांचा मृत्यू झाल्यानंतर पुतळा बनवून त्यांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतलेला आहे.

आपलं काहीतरी चुकलं अशी भावना घरच्यांच्या मनात निर्माण झाली आणि समाजाची प्रथा म्हणून त्यांनी गणेश आणि रंजना यांची मूर्ती तयार केली आणि त्यानंतर त्यांचे लग्न लावले. त्यासाठी त्यांनी पत्रिका देखील छापल्या आणि प्रियकराचा पुतळा लग्नासाठी मिरवणूक काढून मांडवात आणण्यात आला तर मुलीला देखील लग्नासाठी उभे करण्यात आले आणि लोकांच्या खाण्यापिण्याची देखील व्यवस्था यावेळी करण्यात आली. जर वेळेलाच दोन्ही कुटुंबांनी समजूतदारपणा दाखवला असता तर असा सोहळा करण्याची गरज पडली नसती अशा देखील प्रतिक्रिया यावेळी काही जणांनी दिलेल्या आहेत.


शेअर करा