पोलीस आल्यावरही पाच तास टाकीवर बसून अन अखेर..

सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्या प्रकारची जोरदार चर्चा सुरू असून आपल्याजवळ आपली बायको आणि मुले राहत नसल्याने संतप्त झालेल्या एका पतीने नांदेड येथे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलेले आहे. जर आपली बायको आणि मुले परत आली नाहीत तर आपण या टाकीवरून उडी मारून जीव देऊ असे म्हणत तो टाकीवर जाऊन बसलेला होता. पोलीस पथक दाखल झाल्यानंतर तब्बल पाच तास तो तिथेच बसून होता.

उपलब्ध माहितीनुसार, देविदास एरेगे असे या तरुणाचे नाव असून तो निजामाबाद येथे सासुरवाडीला काही दिवस राहिला होता त्यानंतर तो पुन्हा नांदेडला परत आला मात्र त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मुले आली नाहीत म्हणून तो नैराश्यात गेलेला होता. काहीही करून त्यांनी आपल्याकडे यावे अशी त्याची मागणी होती मात्र ते येत नसल्याने तो टाकीवर चढून बसला सुदैवाने पाच तासांनी पोलिसांनी त्याची समजूत काढली आणि त्याला टाकीवरून उतरवले.