धनकवडीत नवऱ्याचे ५० तोळ्यांचे दागिने बायकोनेच केले लंपास ?

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून आपल्या पत्नीने आपले घरातील तब्बल ५० तोळ्यांचे दागिने लंपास केल्याची फिर्याद पती यांनी पोलिसात दिलेली आहे. पुण्याच्या धनकवडी भागातल्या कमल व्हिला सोसायटीच्या परिसरात राहणार्‍या एका पत्नीनं तिच्या पतीचे 50 तोळे सोन्याचे दागिणे लांबवले असल्याचे पतीचे म्हणणे आहे. याप्रकरणी पती प्रदीप वसंत केंदळे (धंदा जीम ट्रेनर रा. कमल व्हिला सोसायटी, इस्काॅन मंदीराजवळ, गोकूळनगर, कात्रज, कोंढवा, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

प्रदीप केंदळे यांनी फिर्यादीत म्हटलंय की, त्यांची पत्नी स्मिता प्रदीप केंदळे (हल्ली रा. बिबवेवाडी, पुणे) हिच्याशी वाद झाल्यानं ते 2014 साली धनकवडीतलं घर खाली करुन गोकूळनगर, कात्रज कोंढवा इथं रहायला गेले. यावेळी प्रदीप केंदळे हे 50 तोळे सोन्याचे दागिने पूर्वीच्या घरातल्या लाॅकरमध्ये ठेवून चावी सोबत घेऊन गेले होते.

त्यांची पत्नी 2015 साली घर सोडून गेली आणि जातांना तिने लाॅकर कशानं तरी उघडून ते दागिने सोबत नेले. 2018 मध्ये ती त्याच घरात रहायला आली होती. त्यावेळी प्रदीप यांनी तिला दागिण्यांविषयी विचारलं मात्र त्यावेळी त्यांनी कुठलीही तक्रार दिली नाही. पंधरा दिवस आईवडिलांकडे धनकवडीत राहिल्यानंतर प्रदीप हे कात्रज कोंढवा इथं रहायला गेले.

2020 मध्ये प्रदीप पुन्हा धनकवडीत आईवडिलांकडे रहायला गेले. एक महिन्यात त्यांची पत्नी घर सोडून निघून गेली. जाताना ३० लाख 6 हजार 500 रुपयांचे 50 तोळ्याचे सोन्याचे दागिणे चोरुन घेऊन गेल्याचं प्रदीप केंदळे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.