बायकोच्या पर्समध्ये तरुणाचा फोटो , जावई सासरी गेला तर ‘ भलताच ‘ अनुभव

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या जावयाला सासरच्या व्यक्तींनी बेदम मारहाण केलेली आहे. त्यांनी केलेल्या मारहाणीनंतर तो बेशुद्ध देखील पडला मात्र तरी देखील सासरच्या व्यक्तींचे समाधान झाले नाही आणि त्यांनी त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये चक्क स्टीलचा ग्लास घुसवलेला आहे त्यानंतर त्याची प्रकृती गंभीर झालेली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.

बिहारच्या मुजफ्फरपुर येथील ही घटना असून हा तरुण साहेबगंज इथे राहणार आहे. घरी आल्यानंतर तो आजारी अवस्थेत डॉक्टरांकडे गेला होता त्यावेळी त्याने आपल्यासोबत सासुरवाडीत घडलेला हा धक्कादायक प्रकार कथन केलेला आहे. डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू केलेले असून प्रायव्हेट पार्ट मध्ये टाकलेला स्टीलचा ग्लास ऑपरेशन करून बाहेर काढलेला आहे.

पीडित तरुणाचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते मात्र त्यानंतर त्याची पत्नी अवघे काही दिवस सासरी राहिली आणि त्यानंतर तिने माहेरी पलायन केले. ती गेल्यानंतर तिच्या पर्समध्ये एका तरुणाचा फोटो तिच्या पतीला आढळून आला आणि त्यानंतर त्यांच्यात संशयाचे वातावरण सुरू झाले. फोनवर भांडण झाल्यानंतर तिची समजूत काढून तिला पुन्हा माहेरी आणण्यासाठी हा पती गेला मात्र सासरी येण्यासाठी ती तयार नव्हती. सासरच्या लोकांच्या हा प्रकार कानी घातल्यावर तरी ते तिला आपल्यासोबत पाठवतील अशी त्याला आशा होती मात्र त्यांनी जावयालाच बेदम मारहाण केली आणि बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये स्टीलचा ग्लास घुसवला. जखमी तरुणावर सध्या बिहार येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे.


शेअर करा