..म्हणून नराधमांचा चक्क महिलेच्या मृतदेहावर ‘ बलात्कार ‘ , महाराष्ट्रातील घटना

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नागपूर परिसरात उघडकीला आलेली होती. कापूस वेचण्यासाठी एक महिला गेली ती पुन्हा आलीच नाही. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यावेळी तिचा चक्क मृतदेहच आढळून आला. नागपूरच्या खापा तालुक्यातील सुरेवाणी गावात ही घटना उघडकीला आणली होती. मयत महिलेचे काय झाले याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासात प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून तीन जणांना बेड्या ठोकलेल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा खून केल्यानंतर आरोपींनी मयत महिलेवर बलात्कार केलेला आहे.

खापा पोलीस ठाण्यात याप्रकरणी बलात्कार आणि हत्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तीन जण सध्या पोलीस कोठडीत आहेत. पीडित महिला ही कापूस वेचण्यासाठी शेतात गेलेली होती त्यावेळी तिथे ती एकटी असल्याचे पाहून हे तीन आरोपी तिथे आले आणि त्यांनी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने विरोध केला त्यानंतर त्यांनी तिला मारहाण करायला सुरू केली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर देखील या नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिथून पलायन केले मात्र जाण्यापूर्वी त्यांनी धारदार कुऱ्हाडीने तिचा गळा देखील कापला.

महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर खापा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून दिला आणि त्यानंतर परिसरात तपास सुरू केला त्यावेळी हा प्रकार समोर आलेला आहे. तीनही आरोपींनी खुनाची कबुली दिलेली असून शारीरिक संबंध ठेवण्यास तिने नकार दिला त्यामुळे संतापात आपण हे कृत्य केले असे म्हटले आहे.