विमाननगरच्या मॉलमध्ये ‘ भलताच ‘ प्रकार , मॅनेजरवर गुन्हा दाखल

पुण्यात विमाननगर भागात असलेल्या एका प्रसिद्ध मॉलमध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून मॉलमध्ये विक्री केल्यानंतर आलेली रक्कम ही कंपनीकडे न जमा करता मॅनेजरने तब्बल 28 लाख रुपयांना कंपनीला चुना लावलेला आहे. विमानतळ पोलिसांनी या मॅनेजरला अटक केलेली असून त्याच्या या कृत्यात इतर कोणाचा सहभाग आहे का याचा देखील पोलीस शोध घेत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, फ्रान्सिस जोसेफ डेविड ( वय 35 राहणार दापोडी ) असे आरोपी मॅनेजरचे नाव असून याप्रकरणी प्रथमेश पैठणकर ( नवी मुंबई ) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे ऑक्टोबर ते 18 डिसेंबर 2022 पर्यंत हा प्रकार मॉलमध्ये घडलेला असून सदर मॅनेजर हा याने स्टोअरमधील कामगार आणि कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांना विश्वासात घेऊन खोटी माहिती व्यवस्थापनाला दिली .

कंपनीच्या आठ लाख रुपये किमतीच्या वस्तू स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्या तसेच कॅश काऊंटरवर जमा झालेली सुमारे 19 लाखांची रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वतः वापरली. फिर्यादी हे या कंपनीमध्ये एरिया मॅनेजर म्हणून काम करत असून हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत आरोपीच्या विरोधात तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी आरोपी मॅनेजरला अटक केलेली असून पोलीस उपनिरीक्षक कुळुरे पुढील तपास करत आहेत