..म्हणून चक्क हायवेच्या मधोमध महिला येऊन झोपली

महिला शेळ्या चारत असताना

महाराष्ट्रात एक वेगळीच घटना नांदेड परिसरात उघडकीस आलेली असून स्थानिक पोलिसांनी आपल्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली असा आरोप करत एका महिलेने चक्क हैदराबाद महामार्ग काही काळ रोखून धरलेला आहे. गुरुवारी रात्री रामतीर्थ पोलीस ठाणे हद्दीत हा प्रकार घडलेला असून महिलेला हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना बरेच मेहनत करावी लागली या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, नांदेड येथील शंकर नगर परिसरात गुरुवारी रात्री ही महिला हैदराबाद महामार्गावर रस्त्याच्या मधोमधच येऊन झोपली. येणारी जाणारी वाहने अंगावरून जाण्याची तिला कुठलीच भीती नसल्याने नागरिकांनी या प्रकाराची दखल घेत तात्काळ रस्त्यावरून बाजूला होण्यास सांगितले मात्र ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. समोरून ट्रक आल्यानंतर देखील तिने ट्रकला अडवला आणि ट्रकचा हेडलाईट बुक्की मारून फोडला. त्यात तिच्या हाताला गंभीर जखम झाली मात्र तरीही मेलो तरी चालेल पण रस्त्यावरून उठणार नाही असे तिचे म्हणणे होते. पोलिसांनी तात्काळ तिथे धाव घेतली आई त्यानंतर अखेर तिची समजूत काढण्यात यश आले आणि वाहतूक सुरळीत झाली.