व्हॅलेंटाईननंतर प्रेयसी ‘ बेकाबू ‘ झाली अन रोज दारापुढे येऊन , प्रियकर कोर्टात..

शेअर करा

प्रेमप्रकरणात अनेकदा ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकर आणि प्रेयसी यांना मोठ्या प्रमाणात मानसिक तणावाचा सामना करावा लागतो त्यातून एकमेकांना त्रास देणे देखील काही प्रमाणात सुरू होते मात्र ब्रिटन येथील एका महिलेला हा प्रकार चांगलाच महागात पडलेला असून न्यायालयाने तिला तिच्या प्रियकरापासून 18 महिने दूर राहण्याचे तसेच 18 महिने कुठलेही समाजकार्य न करण्याचा न करण्याची शिक्षा ठोठावली आहे. सोबतच 50 युरो दंड आणि 395 युरो प्रियकराला भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिलेले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, मिशेल फ्लेटन ( वय 28) असे या तरुणीचे नाव असून तिचा प्रियकर असलेला रयान हरले यांनी तिच्यासोबत सर्व प्रेम संबंध तोडून टाकलेले होते. त्यानंतर पुन्हा त्याच्यासोबत आपण जुळवून घेऊ इथपर्यंत ठीक होतं मात्र काही कालावधीत ती त्याला चक्क त्याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्यासाठी हट्ट करू लागली. आपले नाते तू का तोडले ? तू माझ्याशी का बोलत नाहीस ? असे प्रश्न विचारून ती त्याला स्वतःचे काही इमोशनल फोटो टाकून पुन्हा एकदा त्याच्यासोबत जुळवून घेण्याच्या तयारीत होती. तिने जिद्द सोडली नाही आणि चक्क त्याच्या घराच्या बाहेर रोज गिफ्ट ठेवून जाण्यास सुरुवात केली.

काहीही केले तरी ती आपला पिच्छा सोडत नाही हे लक्षात आल्यानंतर या प्रियकराने सुरुवातीला पोलिसात आणि त्यानंतर कोर्टात धाव घेतली. तब्बल 21 महिने तिने वेगवेगळ्या स्वरूपाने आपल्याशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आपला छळ केला असे या प्रियकराने म्हटलेले असून 15 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत म्हणजे व्हॅलेंटाईनच्या दुसऱ्या दिवसांपासून तर 26 फेब्रुवारीपर्यंत तिने तब्बल 1000 मेसेज आणि कॉल आपल्याला केले. इतक्या मेसेजला आणि कॉलला कंटाळून आपण आत्महत्येचा देखील विचार केला असे सांगितल्यानंतर या प्रेयसीने कोर्टात आपली चूक कबूल केली आहे आणि त्यानंतर न्यायालयाने तिला दंड ठोठावला आहे.


शेअर करा