
काही व्यक्तींना एखाद्या गोष्टीचा इतका नाद असतो की त्यासाठी त्यांची काहीही करण्याची तयारी असते अशीच एक घटना पंजाबमधील डेरा बस्ती इथे समोर आलेली असून लहानपणापासून लॉटरीचा नाद असलेल्या एका व्यक्तीने मोठ्या प्रमाणात या खेळाच्या आहारी जात आपले आयुष्य खर्च केले मात्र अखेर 88 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना तब्बल पाच कोटी रुपयांची लॉटरी लागलेली आहे. निम्मी रक्कम ते आपल्या गावाला आणि निम्मी रक्कम आपल्या मुलांना देणार असून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी पैसा आल्यानंतर त्यांच्या घरापुढे लोकांची लाईन लागलेली आहे.
आपल्या घरची परिस्थिती सुधारावी म्हणून त्यांनी महंत द्वारकादास यांनी तरुण वयात असल्यापासूनच लॉटरीची तिकिटे खरेदी करण्यास सुरुवात केली होती त्यानंतर आत्तापर्यंत त्यांच्या नशिबी अपयशच येत होते मात्र ते त्यामुळे खचून गेले नाहीत. कधी ना कधी आपले नशिबाचे द्वार उघडेल या आशेने ते तिकिटे करत करत खरेदी करत होते याच वेळी झिराकपूर येथील लोकेश नावाच्या एका विक्रेत्याकडून त्यांनी तिकीट खरेदी केले आणि तब्बल पाच कोटींचे बक्षीस त्यांना लागले .
लोकेश यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना महंत द्वारकादास यांनी पंजाब राज्य लोहरी मकर संक्रात बंपर लॉटरी याचे तिकीट खरेदी केले होते आणि त्यानंतर त्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस लागलेले असून पाच कोटी रुपये यातून कर वजा जाऊन साडेतीन कोटी रुपये त्यांना भेटतील असे सांगितले आहे. आत्तापर्यंत त्यांना अशा मोठ्या रकमेची कधीही लॉटरी लागली नव्हती मात्र आपल्याकडून तिकीट घेतले आणि त्यांचे नशीब फळफळले असे लोकेश यांनी म्हटलेले आहे.