समीर वानखेडेंचे ‘ आणखी ‘ एक प्रकरण बाहेर , एका नवीन पंचाचा खळबळजनक दावा

शेअर करा

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखीन वाढ झालेली असून खारघरमधील एका जुन्या प्रकरणातील अजून एक पंच समोर आला आहे . शेखर कांबळे असे या व्यक्तीचे नाव असून एनसीबीविरोधात कांबळे यांनी गंभीर आरोप केले आहेत. खारघरमधील 80/2021 या नायजेरियन ड्रग्स पेडलर प्रकरणात मला पंच करण्यात आलं होतं. त्यावेळी 10 कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेतल्या होत्या. ती कारवाई बोगस होती, असा आरोप पंच शेखर कांबळे यांनी केला आहे.

शेखर कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, ‘ मला पंचनामा वाचायला दिला नाही. जी कारवाई केली गेली ती बोगस होती. त्यात काही सापडलं नव्हतं. मात्र, 60 ग्राम एमडी सापडल्याचं दाखवण्यात आलं होतं. मी आणि माझा एक मित्र प्रचंड दहशतीत आहोत. काल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पेपरमध्ये या केसचा उल्लेख होता. ज्यात 60 ग्राम एमडी पकडल्याचं समजलं, त्यामुळे मी घाबरलो आहे, टीव्ही 9 मराठीशी बोलताना शेखर कांबळे यांनी हे म्हटले आहे .

शेखर कांबळे पुढे म्हणाले की , ‘ मला काल अनिल माने यांचा रात्री फोन आला. पण मी तिथे गेलो नाही, मला आता भीती वाटतेय. कोर्टात केस जाईल तेव्हा न्यायाधीश जे विचारतील तेव्हा मी काय उत्तर देणार? कारण मी पंचनामा वाचलेला नाही. म्हणून मी आता समोर आलोय. समीर वानखेडे मला 19 तारखेपर्यंत खूप वेळा फोन करायचे. मी नायजेरीयन नागरिकांची माहिती द्यायचो. पण त्यांनी मला अंधारात ठेवलं. मी पुढील सगळ्या चौकशीसाठी तयार आहे, असंही शेखर कांबळे यांनी सांगितलं आहे.


शेअर करा