‘ त्यांना लाज वाटायला हवी ‘, किरीट सोमय्या यांचा कोणावर निशाणा ?

प्रभाकर साईल यांनी केलेल्या लाचखोरीच्या आरोपावरुन समीर वानखेडे यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरु करण्यात आली असल्याचे वृत्त आले आहे. सदर छापा हा एनसीबीने टाकला असला भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मात्र तर्क लावत यात शरद पवार व उद्धव ठाकरे यांचा हात असल्याचे म्हटले आहे .’ समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. एका अधिकाऱ्याची जात काढली जाते, त्याच्या बायकोची इज्जत काढली जाते ‘ असेही किरीट सौमय्या म्हणाले आहेत.

काय म्हणाले किरीट सौमय्या ?

महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे दाबण्यासाठीच समीर वानखेडे प्रकरणाची चर्चा सुरु आहे. गेली 12 दिवस झाले समीर वानखेडे दलित की मुस्लिम हा वाद सुरु आहे. अजित पवारांवर 11 दिवस धाडी सुरु होत्या. त्यांना वाचवण्यासाठीच हे प्रकरण सुरु करण्यात आलं. ही सगळी ठाकरे सरकारची बदमाशी सुरु आहे. शरद पवार यांनी स्पष्ट केलं की अजित पवारांकडे चिल्लर सापडली पण बिल्डरकडे 180 कोटी सापडले, त्याच बिल्डरने अजित पवारांना 100 कोटी रुपये दिले आहेत. अजित पवारांचे घोटाळे सिद्ध झाले आहेत. अजित पवार सिंचन घोटाळ्यात आरोपी आहेत. चार्जशीटमध्ये त्यांचं नाव आहे. त्यावरील कारवाई या सरकारने थांबवली आहे ?

महाराष्ट्रात सिंचन घोटाळ्याची चर्चा, स्वतःचे घोटाळे दाबण्यासाठी लक्ष विचलीत करण्याचं काम सुरु आहे. त्यात जर काही घोटाळा असेल तर मग कारवाई करा. नारायण राणेंचा बंगला अनधिकृत असल्याचं सांगता मग तुम्ही कारवाई का करत नाही. संजय राऊत यांचं पत्र मी रद्दीत टाकलं आहे. मी त्या पत्राला दमडीचीही किंमत देत नाही. 31 डिसेंबरपर्यंत अलीबाबा आणि चाळीस चोरांचे घोटाळे काढणार. उद्धव ठाकरे यांनी कितीही ट्रिक काढल्या तरी घोटाळेबाज सुटणार नाहीत.