पुण्यातून उच्च न्यायालयात याचिका दाखल , कौतुकास्पद उपक्रमाची सुरुवात

शेअर करा

महाराष्ट्राला दिशा देणारा जिल्हा म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे. पुणे जिल्ह्यातून एक अत्यंत कौतुकास्पद असा निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे . गणेश उत्सव काळात संपूर्ण महाराष्ट्रात डीजे आणि लेझरचा अनावश्यक वापर मोठ्या प्रमाणात केला जातो त्याचा अनेक जणांना त्रास झालेला आहे म्हणून डीजे आणि लेझरवर कायमस्वरूपी बंदी आणावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे . प्रख्यात कायदे तज्ञ एडवोकेट असीम सरोदे हे या प्रकरणी न्यायालयात युक्तिवाद करणार आहेत .

कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने , शिवसेनेचे शहर सह संपर्कप्रमुख अजय भोसले यांनी या प्रकरणी पत्रकारांना माहिती दिलेली असून सुनील माने म्हणाले की , ‘ डीजे मुळे अनेक जणांना प्राण गमवावे लागलेले आहेत तर अनेक जणांना कायमचे बहिरेपण आलेले आहे लेझरमुळे अनेक जणांची दृष्टी केलेली असून गणेशोत्सवानंतर या गोष्टी प्रकर्षाने समोर आलेल्या आहेत.

सार्वजनिक सण उत्सवात सामाजिक तसेच वैयक्तिक कार्यक्रमात डीजे आणि लेझरचा वापर टाळावा यासाठी आम्ही मोहीम सुरू केलेली असून याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपासून करण्याचे एका बैठकीत आम्ही नियोजन केले होते. बाबासाहेब हे जगासाठी ज्ञान आणि बुद्धीचे प्रतीक असून डीजे आणि लेझरचा वापर न करता बाबासाहेबांची जयंती शांततेत साजरी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

राज्यातील आंबेडकरी जनतेने याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा व्यक्त केलेला असून लोक चळवळीसोबतच कायद्याने देखील यावर बंदी आणावी यासाठी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एडवोकेट असीम सरोदे यांच्यामार्फत आम्ही ही याचिका दाखल केलेली असून नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे .


शेअर करा