‘ शेठ ट्रेडिंगमध्ये नफा आहे ‘ , फसवणुकीचा आकडा ऐकाल तर..

शेअर करा

फसवणुकीचा एक अद्भुत असा प्रकार नवी मुंबईत समोर आलेला असून ट्रेडिंगमध्ये नफा जास्त आहे असे सांगत ऑनलाइन डॉलर खरेदी करण्यास सांगत एका व्यक्तीची तब्बल 57 लाख 63 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे. दोन महिन्यांनी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आलेले असून खारघर पोलिसात या प्रकरणी ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , नरेंद्र सिंग असे या व्यक्तीचे नाव असून त्यांचे वय 53 वर्ष आहे . ऑनलाइन ट्रेडिंगच्या माध्यमातून नफा कमवण्याचा त्यांना मेसेज आलेला होता त्यावेळी त्यांनी मेसेजला प्रतिसाद दिला तेव्हा ऑनलाईन ट्रेडिंग मधून दुप्पट नफा मिळवण्याचे आमिष त्यांना दाखवण्यात आलेले होते.

नरेंद्र सिंग यांनी अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यावर आरोपीने सांगितल्याप्रमाणे 57 लाख 63 हजार रुपये पाठवले मात्र त्यानंतर देखील त्यांना नफा मिळवण्यासाठी आणखीन रक्कम भरावी लागेल असे सांगण्यात आले त्यावेळी आपली फसवणूकच होत आहे असे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी खारघर पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे.


शेअर करा