हॉटेलमध्ये जाताच ‘ बाटली ‘ माथी मारणाऱ्यांनी कधीतरी विचार करा , पुण्यातून मोहीम

शेअर करा

हॉटेलमध्ये गेल्यानंतर एक पाण्याची बाटली ग्राहकाला आणून दिली जाते आणि मनमानी पद्धतीने वीस रुपये तीस रुपये अशा स्वरूपात या बाटलीची रक्कम ग्राहकांकडून आकारण्यात येते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर पाणी देणे हा ग्राहकाचा हक्क आहे मात्र विनाकारण बाटलीबंद पाणी घेण्याची सक्ती नागरिकांवर अप्रत्यक्षपणे केली जात आहे . आपल्याला बाटलीबंद पाणी बळजबरीने माथी मारले जात असेल आणि पाणी दिले जात नसेल तर अन्न आणि औषध प्रशासनाकडे आपण या संदर्भात तक्रार करू शकता.

महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये सध्या हा प्रकार सुरू झालेला असून साधे पाणी आमच्याकडे उपलब्ध नाही किंवा बोरिंगचे पाणी आहे , चांगले पाणी नाही अशी कारणे देत दहा रुपये पाण्याची बाटली तब्बल 30 ते 40 रुपयांपर्यंत ग्राहकांच्या गळ्यात मारली जाते. शहरातील हॉटेलमध्ये साधे पाणी घेऊन पैसे आणि प्लास्टिक कमी करता येते यासाठी पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमधील सेंटर फॉर सस्टेनेबल एन्व्हायरमेंट सेंटर कडून मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. प्राध्यापक गुरुदास नुलकर आणि समन्वयक आदिती देवधर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू आहे.

आदिती देवधर म्हणाल्या की , ‘ खरंतर आम्ही ठरवू कुठलं पाणी प्यायचं ? हे रेस्टॉरंटने परस्पर कसे ठरवावे. साध्या पाण्यापेक्षा बाटलीबंद पाणी हे हेल्दी आहे यावर जर आमचा विश्वासच नसेल तर मग काय करायचे . हल्ली पुण्यात पाणी बाटलीबंद हवय की साधं असा पर्याय देखील न देणारी रेस्टॉरंट वाढत आहेत. बाटलीबंद पाण्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की प्लास्टिक तयार करताना त्यात अनेक रसायने घातली जातात म्हणजे त्या रसायनाचा काही अंश पाण्यात देखील उतरतो आणि हार्मोनल समस्या निर्माण होतात , ‘

आदिती देवधर पुढे म्हणाल्या की , ‘ प्लॅस्टिकचे केवळ दोन ते तीन वेळा रिसायकलिंग होते त्यानंतर ते इतके कमकुवत होते की त्याचे काहीच होत नाही मग पर्यावरणात हा कचरा साठत जातो आणि प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने ते अन्नसाखळीत प्रवेश करतात. एखाद्या रेस्टॉरंटमध्ये आपण बसलो की साधी पाणी हा पर्याय आमच्याकडे नाही असे त्यांनी सांगितले तर मग उठून जाणे अवघड असते ना मग हे आपल्याला आधीच कळाले तर .. नो स्मोकिंग पाटी जशी दिसते तशी काहीशी पाटी रेस्टॉरंट मध्ये देखील लावायला हवी. आम्ही साध्या पाण्याचा पर्याय देतो असे म्हणणाऱ्या रेस्टॉरंटचे कौतुक व्हावे असे सांगत पाण्याच्या बाटलीची सरसकट सक्ती बंद करण्यात यावी ‘, असे देखील त्यांनी म्हटलेले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने या संदर्भात पुढाकार घेऊन नियमितपणे हॉटेलची तपासणी करणे गरजेचे आहे असे देखील त्यापुढे म्हणाल्या.


शेअर करा