महिला पोलिसाने दिला मातृत्वाचा परिचय , सोशल मीडियात जोरदार कौतुक

शेअर करा

आत्तापर्यंत आपण अनेकदा पोलीस दलातील भ्रष्टाचाराच्या आणि पोलिसांकडून होत असलेल्या त्रासाबद्दलच्या गोष्टी ऐकल्या असतील मात्र केरळमधील एरणाकुलम येथील एका खाकी वर्दीतील महिलेचे मातृत्व एका दुर्दैवी बाळासाठी जागृत झाले आणि त्यांनी त्या बाळाला स्तनपान करत त्याचे प्राण वाचवले आहेत . पोलीस मातेचा हा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

उपलब्ध माहितीनुसार , एका चार महिन्याच्या बाळाच्या आईची प्रकृती अचानकपणे गंभीर झाली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले . तिची प्रकृती व्यवस्थित नसल्याकारणाने बाळाला भूक लागल्यानंतर स्तनपान करण्यासाठी चक्क पोलीस महिला पुढे आल्या आणि त्यांनी या बाळाला मांडीवर घेऊन स्तनपान करत मातृत्वाचा परिचय दिला.

सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून त्यांचे हे छायाचित्र पोलिसांनी देखील शेअर केलेले आहे . आर्या असे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून आई ऍडमिट असल्याकारणाने या बाळाला भूक लागून देखील आई स्तनपान करू शकत नव्हती त्यावेळी मूल भुकेने रडत असल्याकारणाने आर्या पुढे आल्या आणि त्यांनी बाळाला स्तनपान करून माणुसकीचे दर्शन घडवले. बाळाचे वडील हे देखील सध्या तुरुंगात असून पोलिसांनी मोठ्या तीन मुलांना जेवू घातले तर चार महिन्याच्या बाळाला आर्या यांनी स्वतः मांडीवर घेऊन स्तनपान केले . त्यांच्या या कृतीचे सोशल मीडियात जोरदार कौतुक करत केले जात आहे .


शेअर करा