पुण्यात आरटीओ एजंटच्या विरोधात गुन्हा दाखल , सुरुवातीला म्हणाला की..

शेअर करा

महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार पुण्यात समोर आलेला असून प्रादेशिक परिवहन कार्यालयात तुमचे काम मार्गी लावून देतो असे सांगत एका व्यक्तीची तब्बल साडेसात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे . 27 तारखेला पोलिसांनी एका दलालाच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , मिलिंद मधुकर भोकरे ( राहणार स्वारगेट ) असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव असून आरोपीचे नाव असून वाघोली येथील एका नागरिकाने या संदर्भात बंडगार्डन पोलिसात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार व्यक्ती यांनी प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जाणारी एसटी खाजगी वापरासाठी मिळावी मात्र त्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज दिलेला होता. आरटीओतील काम करून देण्याच्या आमिषाने भोकरे याने त्यांच्याकडून एक लाख 45 हजार 600 रुपये घेतले मात्र त्यांचे कामही करून दिले नाही आणि पैसे देखील परत केले नाहीत. भोकरे याने अशाच पद्धतीने इतर पाच जणांची देखील फसवणूक केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आलेले असून फिर्यादी यांच्यासह पाच जणांची सात लाख 43 हजार रुपयांची आरोपीने फसवणूक केल्याचे म्हटलेले आहे.


शेअर करा