कोंढव्यात सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन टोकाचे पाऊल , पत्नी म्हणतेय की..

शेअर करा

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून एका बांधकाम व्यवसायिकाकडे काम करणाऱ्या तरुणाने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप शेअर केलेली असून सासरच्या लोकांसमोर बांधकाम व्यवसायकाने आपला अपमान केला त्यामुळे आपण आत्महत्या करत आहोत असे म्हटलेले आहे असे त्याच्या पत्नीचे म्हणणे आहे .

उपलब्ध माहितीनुसार , तोहीद मेहमूद शेख ( वय 26 राहणार कोंढवा ) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून बांधकाम व्यवसायिक अरबाज मोहम्मद अली मेमन ( राहणार कोंढवा ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . तोहीद यांनी कोंढव्यातील कौसरबाग परिसरातील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

बांधकाम व्यावसायिक मेमन यांच्याकडे तोहीद हा काम करत होता मात्र मेमन हे सतत त्याला त्रास देत असायचे असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. सासरच्या व्यक्तींसमोरच आरोपी बांधकाम व्यावसायिक यांनी त्यास अपशब्द वापरून अपमानित केले त्यामुळे तोहीद व्यथित झालेला होता. आपल्या पतीला अशा पद्धतीने वागवल्यानंतर त्याचा त्यांचा अपमान झाला या भावनेतून त्यांनी आत्महत्या केली असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.


शेअर करा